लीलावती
संख्या आणि सौदर्य
जुळतात त्यांची नाती
बहरून येते ही।
अद्वितीय लिलावती।।
साज असे तो शब्दांचा
लावण्य अलंकारांचा
त्यावर नवरसांची नक्षी।
अद्वितीय लिलावती।।।
उदाहरणे आणिक कोडी
सुस्पष्ट अशी ती लेणी
झेलतात गणिती वाणी
अद्वितीय लिलावती।।
कोष्टक आणि कूटक
त्यात सुंदर त्रैराशिक
वर भूमितीची नक्षी
अद्वितीय लिलावती।।
त्रिकोनमिती ही स्पष्ट
त्याचे उज्वल उद्दिष्ट
समजे निसर्गाच्या कुपीत
अद्वितीय लिलावती।।
शृंगार असे युगलाचा
पर त्यात गणिती हेका
खेळ अंश अन् छेदाचा
अदभूत या लिलावतीचा।।
लिलावती पाटीगणित
सोडवी कांता ती नीट
नसे भास्करास त्या भ्रांत
अशी अद्वितीय लिलावती।।
शिकवावे गणित ऐसें
नसे रुक्ष, परी काव्याचे
मुकुटमणी शास्त्रांचे
उधळावे सौंदर्य ऐसें
जसे अदभूत लिलावतीचे।।
@प्राजक्ती(27/07)